Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दारू भट्टीवर छापा

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखा : तावरजखेडा तांडा येथे दारु भट्टी चालू असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या पथकास मिळाल्याने स्था.गु.शा. चे पथक , उस्मानाबाद पो.मु. येथील दंगल नियंत्रण पथक व ढोकी पो.ठा. चे सपोनि- श्री . बनसोडे यांचे संयुक्त पथक हे आज दि . 27 सप्टेंबर रोजी पहाटे नमूद ठिकाणी रवाना झाले .

 पोलीस पथकाने 07.30 वा . सु . तावरजखेडा तांडा येथे दारु भट्टीवर छापा मारला असता 1 ) अशोक तुकाराम चव्हाण 2 ) यशवंत लालसिंग राठोड 3 ) नंदकुमार केशव राठोड 4 ) शंकर बालाजी चव्हाण 5 ) पंडीत गंगाराम जाधव 6 ) नागनाथ किसन राठोड 7 ) संजय विनायक पवार , सर्व रा . तावरजखेडा तांडा हे सर्वजण अप्रत्यक्षरित्या 200 लि.क्षमतेच्या 32 लोखंडी पिंपांत एकुण 6,400 लि . गावठी दारु निर्मीतीचा द्रवपदार्थ बाळगले असतांना पथकास आढळले .

यावर पोलीसांनी दारु निर्मीतीचा द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट केला असून नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम -65 ( फ ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे .

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement