धाराशिव : आगामी नगरपरिषद निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 18(ब) मधून AIMIM पक्षाकडून अझहर मुजावर यांनी भव्य शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील युवा नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केलेले अझहर मुजावर यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी दर्गा हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहमतुल्ला आले येथे चादर अर्पण करून धार्मिक व सामाजिक आशीर्वाद घेतला.
चादर अर्पण केल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह बाईक रॅलीच्या माध्यमातून दमदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दर्गा चौक – मदिना चौक – शाम्स चौक – धारासुर मर्दिनी कमान – छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्ग घेत रॅलीचा प्रभावी प्रचार झाला. उत्साहाने व घोषणांनी भारलेले वातावरण पाहता प्रभागातील मतदारांचा प्रतिसाद सकारात्मक असल्याचे दिसून आले.
अझहर मुजावर यांनी गेल्या काही वर्षांपासून समाजकार्यातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रत्येक अडचणीस त्वरित धावून जाणारा, मदतीचा हात देणारा चेहरा म्हणजेच ‘अझहर मुजावर’, असेच स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः युवावर्गामध्ये त्यांना प्रचंड पाठबळ असल्याचे स्पष्ट जाणवले.
शहरातील राजकीय विश्लेषकांच्या मते, “अझहर मुजावर यांच्या पाठीशी असलेला युवकांचा मजबूत आधार, सामाजिक कार्यातून मिळवलेली लोकमान्यता आणि AIMIMचा वाढता प्रभाव पाहता या निवडणुकीत त्यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे.”
अझहर मुजावर यांनी आपला उमेदवारी अर्ज धाराशिव नगरपरिषद निवडणूक निर्णयाधिकारी ओंकार देशमुख तसेच उपनिवडणूक निर्णयाधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या उपस्थितीत दाखल केला. या वेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक जलील मुजावर, चांद मुजावर तसेच AIMIMचे शहर प्रभारी जमीर शेख उपस्थित होते.
धाराशिवमध्ये वाढत्या राजकीय तापमानात अझहर मुजावर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या भव्य रॅलीने प्रभागातील निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.
0 Comments