उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरांसह तेर ढोकी येडशी तडवळा कावळेवाडी आदी गावाची तहान भागविणाऱ्या तेरणा मध्यम प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.दिनांक 23 सप्टेंबर गुरूवार रोजी सकाळी तेरणा धरण भरून वहात आहे.त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या गावांतील नागरिकांसह शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे विशेष म्हणजे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून धरणाच्या वरच्या बाजूला पडत असलेल्या दमदार पावसामुळे तेरणा मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होऊन दिनांक 23सप्टेंबर रोजी तेरणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे
१८ वर्षाच्या कालावधीत ६ वेळेस भरले धरण
विशेष म्हणजे सन २००३ ते २०२० या १८ वर्षांच्या कालावधीत तेरणा धरण यापूर्वी २००६ , २००८ , २०१० , २०१६ , २०१७ , साली पूर्ण क्षमतेने भरुन वाहिले आहे .योगायोग म्हणजे गतवर्षी २१ सप्टेंबर २०२० मध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरुन वाहिले होते यावर्षी २३ सप्टेंबर ला भरून वहात आहे
0 Comments