“चोरीच्या तीन गुन्ह्यांतील मालासह दोघे अटकेत.”
कळंब पोलीस ठाणे : भगवान गदळे, रा. केज यांचा स्मार्टफोन काल दि. 25.10.2021 रोजी 15.00 वा. कळंब येथील साप्ताहीक बाजारातून अज्ञाताने चोरला होता. या प्रकरणी त्यांनी कळंब पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 नुसार 360 /2021 हा गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याची उकल करतांना कळंब पो.ठा. च्या पोनि- श्री. यशवंत कदम यांच्या पथकातील पोहेकॉ- सुनिल कोळेकर, पोना- हंगे, दळवी, मुंडे पोकॉ- पतंगे, शेख, मुळे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आज दि. 26.10.2021 रोजी दिपक विलास पवार, रा. कळंब यासह त्याचा जोडीदार कृष्णा वैजनाथ कदम, रा. बीड जिल्हा यांना कळंब येथून ताब्यात घेतले. यावेळी वर नमूद चोरीचा स्मार्टफोन त्यांच्या ताब्यात आढळल्याने पोलीसांनी अधिक विचारपूस केली असता घरगुती वापराच्या तीन एलपीजी टाक्या, स्वयंपाकाची स्टील भांडी असे साहित्य आढळले. या तीन टाक्यां विषयी मालकी- ताबा या बाबत ते पोलीसांना समाधानकारक माहिती देउ शकले नाहीत. यावरुन पथकाने अभिलेखावरील गुन्हे पडताळले असता नमूद तीन टाक्यांसह स्वयंपाकाची भांडी चोरीस गेल्यावरुन कळंब पो.ठा. येथील अनुक्रमे गु.र.क्र. 6 व 169, / 2021 दाखल असल्याचे समजले. यावर पथकाने नमूद सर्व मालासहीत त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारे कळंब पोलीसांच्या कौशल्याने स्मार्टफोन चोरीच्या गुन्ह्यासह चोरी, घरफोडीच्या अन्य दोन गुन्ह्यांची उकल झाली.
“बनावट इंधन विक्री प्रकरणी गुन्हा दाखल.”
उमरगा पोलीस ठाणे : उमरगा परिसरात जैव डिझेल सदृश्य इंधनाची धोकादायकरित्या विक्री होत असल्याच्या माहितीवरुन उमरगा पोलीसांनी दि.24.10.2021 रोजी 23.30 वा. येळी शिवारातील लकी ढाबा परिसरात छापा टाकला. यावेळी ढाब्यामागील पत्रा शेडमध्ये 2,000 लि. क्षमतेच्या 13 प्लास्टीक टाक्यांमध्ये प्रत्येकी 230 लि. बायोडिझेल सदृश्य द्रव इंधन असे एकुण 2990 लि. इंधन, 2,500 लि. क्षमतेच्या 3 रिकाम्या प्लास्टीक टाक्या, द्रव पदार्थ मोजण्यासाठी तोटीसहीत नळी व मीटर असलेले मापन यंत्र, प्रत्येकी 1 व 1.5 अश्वशक्ती क्षमतेच्या दोन विद्युत उपसा पंपांसह नळ्या, विद्युत निर्मीतीचा एक लघु संच, ट्रक क्र. के.ए. 56- 5665 अशा साहित्यानिशी अवैध इंधन विक्री व्यवसायास धोकादायकपने बाळगले असल्याचे आढळले. या प्रकरणी पोना- संजीव शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन बसवकल्याण, कर्नाटक येथील रवि चंदनखेरे, तिपन्ना पिलमगोले, सतिश सरवदे, स्वामी, यांसह येळी ग्रामस्थ -अब्दुल शेख, यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 285, 287, 336, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“अवैध गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल.”
लोहारा पोलीस ठाणे : लोहारा पोलीस ठाण्याचे पथक दि. 19.10.2021 रोजी 21.40 वा. सास्तुर गावातील चौकात कर्तव्यास असतांना पथकाने बाजूस उभ्या असलेल्या इनोव्हा कार क्र. एम.एच. 14 ईपी 7986 ची संशयावरुन झडती घेतली. यावेळी वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखू, गुटखा सदृश्य पानमसाल्याच्या पुड्या असलेली 35 पोती आढळली. यावरुन पोलीसांनी वाहनासह नमूद साठा जप्त करुन अन्न व औषध प्रशासनास माहिती दिली होती. या प्रकरणी पोकॉ- लक्ष्मण भोपळे यांनी दि. 25.10.2021 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 सह मो.वा.का. कलम- 24 (2)/ 177 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई.”
उस्मानाबाद पोलीस दलातर्फे दि. 25 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी महत्वाच्या रस्त्यांवर मोटार वाहन कायदा- नियम भंग करणाऱ्यांवर एकुण 210 कारवाया करुन 45,700 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.
“महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत कारवाई.”
उस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन मुरुम पोलीसांनी दि. 25.10.2021 रोजी हद्दीत छापे मारले. यात नाईकनगर येथील किरण पवार हे आपल्या राहत्या घरासमोर एका कॅनमध्ये 5 लि. गावठी दारु बाळगलेले तर शास्त्रीनगर तांडा, दाळींब येथील शंकर चव्हाण व दिपक राठोड हे आपापल्या घरासमोर 2,580 ₹ किंमतीच्या देशी- विदेशी दारुचा साठा बाळगलेले आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 65 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस दि. 24.10.2021 रोजी 22.30 वा. गस्तीस असतांना हुतात्मा स्मारक परिसरात गणेश माने व हर्ष चव्हाण हे दोघे मद्यधुंद अवस्थेत विनाकारण आरडाओरड करुन सार्वजनिक शांतता भंग करत असल्याचे आढळले. यावरुन पोना- अतुल जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 85 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“चोरी करतांना शेळी चोर अटकेत.”
उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : गावसूद येथील सिताराम गिते यांच्या शेतातील शेडचा पत्रा दि. 24.10.2021 रोजी 22.30 वा. उचकटून आतील शेळ्या चोरण्याचा प्रयत्न ग्रामस्थ नागनाथ पेठे व सुनिल पवार हे दोघे करत होते. हा प्रकार गिते यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून शेजाऱ्यांच्या सहकाऱ्याने नागनाथ यास जागेवरच पकडले तर तर सुनिल हा एक शेळी चोरुन मोटारसायकलवर शेळीसह पसार झाला. यावरुन गिते यांनी दि. 25 ऑक्टोबर रोजी पहाटे पोलीस ठाणे गाठून दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“अपहरन.”
उमरगा पोलीस ठाणे : उमरगा येथील श्रीपाद दुर्गादास जाधव हा 13 वर्षीय मुलगा दि. 21.10.2021 रोजी घरुन बेपत्ता झाला. यावरुन त्याचे अज्ञात कारणासाठी कोण्या अज्ञाताने अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या आई सुमीत्रा जाधव यांनी दि. 25.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“जाळपोळ.”
तुळजापूर पोलीस ठाणे : हंगरगा (तुळ) येथील हरीश्चंद्र नन्नवरे यांच्या शेतातील कापनी केलेल्या सोयाबीन पिकाचा ढिग दि. 24.10.2021 रोजी 20.30 वा. सु. आगीत जळाल्याने त्यांचे सुमारे 1,00,000 ₹ चे आर्थिक नुकसान झाले. ही आग ग्रामस्थ- आकाश चौगुले व अजय काळे यांनी जाणीवपुर्वक लावली असावी अशा मजकुराच्या रविंद्द हरीश्चंद्र नन्नवरे यांनी दि. 25.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“चोरी.”
तुळजापूर पोलीस ठाणे : उस्मानाबाद येथील सुनिता माने या दि. 25.10.2021 रोजी तुळजापूर येथील जुन्या बस स्थानकातील बसमध्ये चढत असतांना त्यांच्या डाव्या हातातील 20 ग्रॅम वजनाची सोने धातूची बांगडी अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन चोरली. अशा मजकुराच्या माने यांनी दिलेल्या प्रथम खबरवेरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मारहान.”
लोहारा पोलीस ठाणे : फणेपूर, ता. लोहारा येथील खंडू निंगशेट्टी हे दि. 25.10.2021 रोजी 11.00 वा. शेतातील झाडाखाली झोपले होते. यावेळी त्यांचा मुलगा- ईश्वर वय 29 वर्षे याने त्यांना झोपेतून उठवून 10 एकर शेतजमीन आपल्या नावे करण्याचा तगादा लावून, शिवीगाळ करुन खंडू यांच्या डोक्यात दगड फेकून मारल्याने ते जखमी झाले. अशा मजकुराच्या खंडू यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग उस्मानाबाद पोलीस.
0 Comments