उस्मानाबादः घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले . ही घटना उस्मानाबाद ही शनिवारी ( दि .२३ ) घडली . याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . चोरीच्या वाढत्या घटनेमुळे नागरिकात भितीचे वातावरण पोलिसांनी पसरले असून चोरट्यांना जेरबंद करावे , अशी मागणी होत आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , उस्मानाबाद येथील शिवसृष्टीनगर येथील रहिवाशी मनिषा मस्के या त्यांच्या मुलासह शनिवारी बाहेरगावी गेल्या होत्या . दरम्यान स . १०.३० ते सायं . ५.३० या कालावधीत घराच्या परिसरात सामसूम असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला . तेथील कपाट फोडून चोरट्यांनी ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले . याप्रकरणी मनिषा मस्के यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली . त्यावरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे . जिल्ह्यात कुलूपबंद घराच्या चोरीचे सत्र सुरूच आहे . पोलिसांनी चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात , अशी मागणी नागरिकातून होत आहे .
0 Comments