Ad Code

Responsive Advertisement

नगरपालिका निवडणूक चा बिगूल वाजला; प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

मुंबई -  नगरपालिका प्रभाग रचनेचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला असून यामुळे लवकरच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . यात जिल्ह्यातील १५ नगरपालिकांचा समावेश आहे . त्यानुसार आता १० मार्च रोजी प्रारूप तर १ एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचना जाहिर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
या पार्श्वभूमिवर , आज राज्य निवडणूक आयोगाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून नगरपालिका निवडणुकांमधील सर्वात महत्वाचा घटक असणाऱ्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे . यानुसार राज्यातील अ , ब आणि क वर्गात येणाऱ्या नगरपालिकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे . यात अ वर्ग नगरपालिकांचे मुख्याधिकारी २ मार्चपर्यंत प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार असून आयोग याला ७ मार्च २०२२ रोजी मान्यता देणार आहे . यावर १० ते १७ मार्चच्या दरम्यान हरकती घेता येतील . यावरील सुनावणी २२ मार्च रोजी होईल . जिल्हाधिकारी याला २५ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील . तर १ एप्रिल २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळणार आहे . हीच प्रभाग रचना जिल्हाधिकारी ५ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करतील .

दरम्यान , ब आणि क वर्गातील नगरपालिकांसाठी हाच कार्यक्रम असून यात राज्य निवडणूक आयोगाकडे नव्हे तर पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे . अर्थात , यासाठी नगरपालिकांचे मुख्याधिकारी २ मार्चपर्यंत प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार असून ते याला ७ मार्च २०२२ रोजी मान्यता देणार आहे . यावर १० ते १७ मार्चच्या दरम्यान हरकती घेता येतील . यावरील सुनावणी २२ मार्च रोजी होईल . तर १ एप्रिल २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळणार आहे . हीच प्रभाग रचना जिल्हाधिकारी ५ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करतील . यामुळे निवडणुका एप्रिलचा अखेरचा आठवडा अथवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे .
असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम 

दि . 2 मार्च प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणे . दि . ) मार्च प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकान्याकडून मान्य मिळणे ,

 हरकती व सुचना

 दि . 10 मार्च प्रारुप प्रभाग रचना , प्रभागदर्शक नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सुचना मागवण्यासाठी वृत्तपत्र व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदेच्या वेबसाईटवर प्रकाशित करणे . दि . 10 ते 17 मार्च- हरकती व सुचना मागविणे . दि . 22 मार्च हरकती व सुचनावर सुणावणी . दि .25 मार्च हरकती व सुचनाच्या अनुषंगाने अभिप्राय देवून संबंधित विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक , नगर परिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठवणे . दि . एप्रिल अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement