Ad Code

Responsive Advertisement

डॉ.प्रतापसिंह पाटील महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांने सन्मानित

डॉ.प्रतापसिंह पाटील  महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांने सन्मानित

उस्मानाबाद (प्रतिनिधी)महाबळेश्वर भिलार येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना,महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2022  सोहळा व एकदिवसीय अधिवेशन आयोजित केले होते.यामध्ये  महाराष्ट्रातील आठ व्यक्तींना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आले होते.हे पुरस्काराचे वितरण व अधिवेशन  मोठ्या थाटात व मान्यवरांच्या उपस्थितीत  पार पडले.

यामध्ये मराठवाड्यातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले.

गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने ग्रामीण भागातील शिक्षण प्रसाराचे काम तळमळीने करत गोरगरीब विद्यार्थ्यांना सातत्याने मदत करत अनेक कुटुंबांना नोकरी व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.या कार्याची दखल घेत डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने डॉ.प्रतापसिंह पाटील यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार देण्यात आला.

 यावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.चंद्रकांत पाटील,शालेय शिक्षण मंत्री ना.दिपक केसरकर,अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराजे देसाई व कार्याध्यक्ष म्हणून खासदार श्रीनिवास पाटील,राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष ना.राजेश क्षिरसागर,माण खटावचे आ.जयकुमार गोरे 
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची उपस्थिती होती.यावेळी महाराष्ट्रातील प्रिया संपादक पत्रकार संघटनेचेयावेळी महाराष्ट्रातील पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते

बदलत्या काळानुसार पुढेही सामाजिक व शैक्षणिक कार्य करणार- डॉ.प्रतापसिंग पाटील

महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असून भविष्यात देखील ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी गोरगरिबांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.शिक्षणात कालानूरूप बदल होतात त्या पद्धतीने आमच्या संस्थेत देखील नवनवीन कोर्स उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement