Ad Code

Responsive Advertisement

पवारांच्या सूचक वक्तव्यानंतर कार्यकर्त्यात जल्लोष!

पवारांच्या सूचक वक्तव्यानंतर कार्यकर्त्यात जल्लोष!!
मुंबई: मी हा निर्णय घेतलेला तो पक्षाच्या भवितव्यासाठी घेतलेला निर्णय होता अर्थात यासाठी कार्यकर्त्यांची चर्चा करणे आवश्यक होतं मात्र कार्यकर्त्यांनी मला राजीनामा देण्याची परवानगी दिली नसती त्यामुळे मी हा स्वतः निर्णय घेतला मात्र कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित करून चालणार नाही त्याचबरोबर देशभरातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी मी चर्चा करणार असून त्यानंतर येत्या एक ते दोन दिवसांमध्ये योग्य तो याबाबत निर्णय घेईल की ज्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांना उपोषण आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असाच निर्णय घेतला जाईल असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आज केला आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सलग दुसऱ्या दिवशीही जमलेले असून कार्यकर्ते आंदोलन करत आहेत अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे यादरम्यान दिलेले आहेत. साहेब हाच आमचा पक्ष असून त्यांनी राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि पक्षाचे नेतृत्व त्यांनीच यापुढेही करावं अशी तीव्र मागणी कार्यकर्त्यांकडून आजही करण्यात आली. अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी आज शरद पवार यांनी व्यक्तिगत चर्चा केली यानंतर माध्यमांसमोर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बोलताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी आदर करत असल्याचं सांगितलं. एकंदरीत येत्या दोन दिवसात राष्ट्रवादी पक्षांतर्गत मोठ्या घडामोडी चर्चा होण्याची शक्यता असून एकंदरीत राज्यातील कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांचा सूर पाहता शरद पवार यांना राजीनामाच्या निर्णयाचा फेर विचार करावा लागणार अशीच परिस्थिती सध्या दिसून येत आहे. त्या अनुषंगाने त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित करून चालणार नाही हे सांगत या गोष्टीला दुजोरा दिला असल्याचं बोललं जात आहे. मात्र शरद पवार अंतिम निर्णय नेमका काय घेणार याबद्दल विविध तर्क वितर्क अजूनही व्यक्त केले जात आहेत.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement