Ad Code

Responsive Advertisement

उन्हाळा आला आरोग्य सांभाळा प्रत्येकांनी उष्माघातापासून बचाव करावा



उन्हाळा आला आरोग्य सांभाळा प्रत्येकांनी उष्माघातापासून बचाव करावा.
सर्वसाधारणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. तथापी या वर्षी माहे मे या महिन्यापासून अतितीव्र उन्हाळा जानवत आहे. त्यामुळे मृत्यूही होणे संभाव्य असते. महाराष्ट्रात विदर्भ व मराठवाडा या विभागांत उष्माघात प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येतो. त्यामानाने इतरत्र प्रमाण अगदीच अल्प असते. उष्माघाताने मृत्यू होऊ नये यासाठी आपण आतापासून जागरुक राहीले पाहीजे. रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी अगोदरच तयारी करुन ठेवणे आवश्यक आहे.

अतिजोखमीचे घटक : ६५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती २) १ वर्षाखालील व १ते ५ वयोगटातील मुले. ३) गरोदर माता व्यक्ती, मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक ५) अतिउष्ण वातावरणामध्ये काम करण्याच्या व्यक्ती.

उष्माघात होण्याची कारणे : उन्हाळयामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, काच कारखान्यातील, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे,जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे,अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

लक्षणे : थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटात वेदना येणे अथवा बेडके येणे. व अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी,प्रतिबंधात्मक उपाय, वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे,कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत, उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे, सरबत प्यावे, अधुनमधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी, वरील लक्षणे सुरु होताच ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा,उन्हात बाहेर जातांना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरण यांचा वापर करावा. उपचार :१) रुग्णास वातानुकुलीत खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, २) रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. ३) रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. ४) रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात, आईस पॅक लावावेत. ५) आवश्यकते नुसार सलाईन देणे. कुलर ठेवावेत, उष्माघाताची कारणे, लक्षणे व प्राथमिक उपाययोजना त्याचप्रमाणे उष्माघात होऊ, नये म्हणून प्रत्येकानी काळजी घ्यावी

 

                                 ****

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement