Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद शहरातील अंडरग्राउंड ड्रेनेज कामातील अनियमिततेमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

उस्मानाबाद शहरात सुरू असलेल्या अंडरग्राउंड ड्रेनेजच्या कामातील अनियमिततेमुळे अमित भारत पुंडपल (वय 26) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
   
या संदर्भात अधिक माहिती अशी की उस्मानाबाद शहराच्या विविध भागात अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून पाईपलाईन टाकली जात आहे. पाईप टाकल्यानंतर मात्र मुरूम व्यवस्थित न टाकता अर्धवट खड्डे, रस्ते पावसामुळे चिखलमय झालेले आहेत. अमित पुंडपल यास हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी घेऊन जात असताना अंडरग्राउंड ड्रेनेजच्या उखडलेल्या रस्त्यामुळे त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यास विलंब झाला आणि यातच त्याचा दुर्दैव मृत्यू झाला आहे. याची माहिती मिळतच भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाद्यक्ष नितीन काळे यांनी पुंडपल यांच्या निवासस्थानी भेट देउन नातेवाईकांचे सांत्वन केले.
       
शहराच्या सर्वच नागरी वस्त्यांमध्ये अंडरग्राउंड ड्रेनेजच्या कामामध्ये अनियमितता झाली असल्यानेच उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यास विलंब झाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी या भागातील रस्त्यांची पाहणी करुन प्रशासनास योग्यत्या सूचना दिल्या.

यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, शहराध्यक्ष राहुल काकडे, अभिजित काकडे, दत्ता पेठे, अमोल राजेनिंबाळकर, विनोद निंबाळकर, संदीप इंगळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement