धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांचा उद्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली असून उस्मानाबाद 40 लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना मिळणार असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे.
अर्चना पाटील यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सकाळी 11 वाजता पक्षप्रवेश आहे. मुंबई येथे पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार असुन त्यानंतर त्यांच्या नावाची लोकसभेचा महायुतीचा उमेदवार म्हणून घोषणा होऊ शकते.
अर्चना पाटील यांनी राजकारणात येण्यापूर्वी लेडीज क्लबच्या माध्यमातून महिलांचे संघटन निर्माण केले आहे तसेच बचत गटांच्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक छोट्या छोट्या गावाच्या घरापर्यंत पोहोचल्या आहेत. अर्चना पाटील यांनी पुण्यातील महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
0 Comments