प्रतीक्षा संपली, उद्या लागणार बारावीचा निकाल!
दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार; दहावीचा निकालही लवकरच!
– महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बोर्डाकडून उद्या (दि.२१) दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उद्या आपला निकाल हा पाहू शकतील. या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागून आहे. आज राज्य मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख जाहीर केली असून, निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती. विद्यार्थी उद्या https://mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर त्यांचे निकाल तपासू शकतात. मागीलवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात आला होता, तर दहावीचा निकाल २ जूनला लागला होता. बोर्डाकडून दहावीचा निकाल मेच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल, असे यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले आहे.
0 Comments