Ad Code

Responsive Advertisement

खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

“खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड.”

स्थानिक गुन्हे शाखा मयत नामे- संदेश भाउसाहेब पाटील, वय 23 वर्षे, रा. करजखेडा ता. जि. धाराशिव यांचा दि. 24.05.2024 रोजी करजखेडा येथे त्यांचे राहते घरासमोर ओठ्यावर झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने ढोक्यात दगड घालून जिवे ठार मारले. यावरुन बेंबळी पोलीस ठाणे येथे दि. 25.05.2024 रोजी भा.दं. वि. सं. कलम- 302, 34 अन्वये गुन्हा क्र. 129/2024 हा नोंदवला आहे.
 सदर गुन्ह्यातील तपासा दरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटके, श्री अमोल मोरे, पोहेकॉ/530 अमोल निंबाळकर, पोहेकॉ/327 विनोद जानराव, सय्यद हुसेन, जावेद काझी, पोना/ 1479 नितीन जाधवर, पोना/1611 बबन जाधवर, मपोहा/ शैला टेळे, चालक पोहेकॉ/ संतोष लाटे, पोहेकॉ/67 विजय घुगे, चालक पोकॉ/564 प्रशांत किवंडे असे पथके रवाना झाले. पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर मयत नामे संदेश भाउसाहेब पाटील हा घरात नेहमी वडील व भावा सोबत जमीणीचे वाटणीचे कारणावरुन व नवीन चारचाकी कार खरेदीचे कारणावरुन भांडण तक्रारी शिवीगाळ करत होता. त्याचे नेहमीच्या या कारणामुळे वडील व भाउ वैतागले होते. त्याचाच राग मनात धरुन वडील नामे भाउसाहेब गोविंदराव पाटील व भाउ नामे प्रितम भाउसाहेब पाटील या दोघांनी संगणमत करुन दि. 24.05.2024 रोजीचे मध्यरात्रीचे सुमारास मयत नामे संदेश भाउसाहेब पाटील हा राहतेघरासमोरील ओट्यावर झोपला असताना त्यास झोपेतच डोक्यात दगड घालून जीवे ठार मारले आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळल्यावरुन पथकाने नमुद आरोपी वडील नामे- 1)भाउसाहेब गोविंदराव पाटील, 2) भाउ नामे- प्रितम भाउसाहेब पाटील रा. करजखेडा ता. जि. धाराशिव यांना ताब्यात घेवून नमुद आरोपीकडे सदर गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता सदरचा गुन्हा आम्हीच केला आहे अशी कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी पो स्टे बेंबळी येथे हजर केले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक- श्री. वासुदेव मोरे, सपोनि- श्री. अमोल मोरे, श्री. सचिन खटके, पोहेकॉ/अमोल निंबाळकर, विनोद जानराव, सय्यद हुसेन, जावेद काझी, नितीन जाधवर, बबन जाधवर, मपोहा/ शैला टेळे, चालक पाहेकॉ/ संतोष लाटे, घुगे, चापोकॉ/ किवंडे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement