Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद जिल्हा नामांतर विरोधी कृती समितीतर्फे मा. सर्वोच्च न्यायालयात मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध आव्हान याचिका दाखल

उस्मानाबाद जिल्हा नामांतर विरोधी कृती समितीतर्फे मा. सर्वोच्च न्यायालयात मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध आव्हान याचिका दाखल 
धाराशिव : उस्मानाबाद जिल्हा नामांतर विरोधी कृती समितीतर्फे मा. सर्वोच्च न्यायालयात मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या उस्मानाबाद-धाराशिव नामांतराचा निकाला विरुद्ध आव्हान याचिका दि. 5 जुलै रोजी दाखल करण्यात आली आहे. दोन आठवड्यामध्ये सुनावणी सुरू होईल अशी माहिती याचिका करते यांच्यावतीने देण्यात आली आहे. 
 शहरातील शेख मसूद इस्माईल , कादरखाॅन पठाण, खलील गफुर कुरेशी,अय्याज हरुन शेख (बबलू) , खलील सैफ सय्यद (सर ), असदखाॅन अश्रफखाॅन पठाण, इस्माईल बाबासाहेब शेख, निजामोद्दीन बडेमिया मुजावर (बाबा), वाजिदखाॅन हमिदखाॅन पठाण,  अतिक अहेमद अ.बशीर शेख, सामियोद्दीन गुलाम सिद्दीक मशायक , इद्रिस हसन बशीर पीरजादे ( अफरोज) , इम्तियाज हसणं बागवान, इलियास रहमुतुल्ला पिरजादे, , काझी सय्यद कलीमोद्दीन इजहारोद्दीश ( एजाज) , इब्राहिम बाबा शेख, शब्बीर गवंडी ई.नी उस्मानाबाद नामांतरण विषयी चालू असलेल्या लढायला मा. सर्वोच्च न्यायालयात यासाठी अपील दाखल केले आहे. 

माननीय सर्वोच्च न्यायालयात अँड अग्रवाल यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. अँड सतीश तळेकर व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील याबाबत उस्मानाबाद नामांतरणाची बाजू मांडणार आहेत. अशी माहिती नामांतरण विरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement