Ad Code

Responsive Advertisement

“धाराशिव जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.” 26 लाखचा मुद्देमाल जप्त

“धाराशिव जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.”  26 लाखचा मुद्देमाल जप्त 

दि.03.11.2024 रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शेलार यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहनामध्ये कोथळी पुलाचे जवळ चेकपोस्ट येथुन अवैध गुटखा वाहतुक करीत आहे. अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन मुरुम पोलीस ठाण्याचे पथकाने सदर ठिकाणी जावून एक पांढऱ्या रंगाचे पिकअप क्र एमएच 23 एयु 5810 थांबवून चेक केले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. सदर वाहनाचा चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव- नेहाल माजिद काझी, वय 23 वर्षे, रा. सईज गल्ली धाराशिव, रिजवान शेख रा. खाजा नगर धाराशिव असे सागिंतले त्यावर पथकाने सदर पिकअप व त्यातील मिळून आलेला रॉयल 220टोकॅको 32 गोण्या, बाओबाजी पान मसाला 64 गोण्या, रॉयल 717 तंबाखु, हिरा पानमसाला, 10 गोण्या एकुण 18,76,160₹ किंमतीचा सह पिकअप वाहन क्र एमएच 23 ए.यु.5810 असा एकुण 26,76,160₹ किंमतीचा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला माल व आरोपी नामे- नेहाल माजिद काझी, वय 23 वर्षे, रा. सईज गल्ली धाराशिव, रिजवान शेख रा. खाजा नगर धाराशिव यास ताब्यात घेवून आरोपी यांचे विरुध्द पोलीस ठाणे मुरुम येथे गुरनं 316/2024 भा.न्या. सं. कलम 223,274,275, 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा पोलीस निरीक्षक दहिफळे करत आहे.
          सदर कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शेलार, मुरुम पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दहिफळे, पोउपनि श्री गव्हाणे, मुरुम पोलीस ठाण्याचे अंमलदार यांचे पथकाने केल

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement