धाराशिव जिल्हातील उमेदवारा साठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा धाराशिव येथे संपन्न
धाराशिव - (प्रतिनिधी ) :- धाराशिव जिल्हातील उमेदवारा साठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा धाराशिव शहरातील सिधाई मंगल कार्यलय येथे प्रचार सभा संपन्न झाली
प्रचार सभा मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी जनतेला संबोधित करुन उमेदवारांचा परिचय करुन दिला. तुळजापुर विधानसभेच्या उमेदवार डॉ.स्नेहाताई सोनकाटे यांच्या पाठीशी उभे रहा असे आव्हान त्यांनी सकल ओबीसी समाजाला केले.
⁃ "ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं, मराठा समाजाचं ताट वेगळ
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाच ताट वेगळ आणि ओबीसी समाजाच ताट वेगळं असावं असं त्यांनी भाष्य केलं. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा फॉर्म्युला आपल्याकडे असल्याचं सांगितलं. मी प्रस्थापित मराठ्यांपेक्षा जास्त विस्थापित मराठ्यांचा विचार करतो म्हणूनच ॲड. डिकले सारखा सुशिक्षीत उमेदवार दिला अस ते म्हणाले.
⁃ ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असं मी मानतो.
आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा आणि संविधानवादी उमेदवाराला निवडून द्यावे.
- आरक्षणाचे महत्व जाणुन सजगपणे मतदान करा.
- "ओबीसी आरक्षण वाचवण्याची आणि एससी ,एसटी आरक्षणाच वर्गीकरण थांबवण्यासाठी वंचितच्या उमेदवारांना निवडूण देणं अत्यंत महत्त्वाचं."
महाविकास आघाडी आणि महायुती यांची मिलीभगत आरक्षण संपवण्याच्या कुरघोडी चालू आहेत,असा आंबेडकरांचा दावा.
- "डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या विजयाची सभा."
चार उमेदवारांपैकी सर्वात जास्त लोक डॉ.स्नेहाताई सोनकाटे यांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी उपस्थित होते. "स्नेहाताई सोनकाटे यांनी असा दावा केला की ही सभा माझ्या विजयाची सभा आहे."23 नोव्हेंबर ही फक्त औपचारिकता जाहीर करण्याची तारीख असेल. "मी बाळासाहेबांना वचन दिले की तुमची मुलगी ही सभागृहात जाऊनच दाखवेल अस त्या सभे नंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या."
-- डॉ.स्नेहाताई म्हणाल्या "प्रस्थापित नेते माझ्या प्रचाराला घाबरले असुन ते आता रडीचा डाव खेळत आहेत.
प्रस्थापित राणा पाटील हे माझ्या प्रचार यंत्रणेमध्ये अडथळा आणण्याचे अनेक प्रयत्न करत आहेत. माझ्या अधिकारनाम्यातील एका खऱ्या वाक्याने ते खुप घाबरले आहेत .निवडणूक आयोगाला हाताशी धरून ते माझ्या लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत."
- - सोनकाटे म्हणाल्या "जनतेमध्ये राणा पाटलांविषयी खूप रोष आहे. त्यांनी काहीच काम न करता निष्क्रियपणे मतदार संघात प्रस्थापित तोरा मिरविला आहे. हा तोरा येणाऱ्या निवडणुकीत जनता नक्कीच उतरवेल आणि राणा पाटलांना जनसामान्यांचे प्रश्न समजण्यासाठी वेळ मिळेल."
- -"ओबीसी समाजाची एकजुट ही भक्कम आहे आणि ही एकजुटच माझ्या विजयाचं कारण ठरणार आहे" असा वंचितच्या उमेदवार डॉ. स्नेहाताई यांचा दावा.
0 Comments