धाराशिव, दि. १७ (प्रतिनिधी) - धाराशिव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती संचलित धाराशिव प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक, शिक्षक व सेवक यांची जबाबदारी स्वीकारली. विद्यार्थ्यांनी शाळा सुरू होण्यापासून सुट्टी होईपर्यंत सर्व वर्ग व्यवस्थित सांभाळले. इंग्रजी, गणित, हिंदी, विज्ञान, इतिहास-भूगोल व नागरिकशास्त्राचे धडे देत त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या.
समारंभात शाळेच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रशालेचे सचिव दिलीप गणेश, उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव, मुख्याध्यापक पंडित जाधव व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या.
या समारंभाला विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments