Ad Code

Responsive Advertisement

“इच्छुक नगरसेवकांची प्रतीक्षा आज संपू शकते! राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आज”


“इच्छुक नगरसेवकांची प्रतीक्षा आज संपू शकते! राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आज”

मुंबई (दि. ४ नोव्हेंबर २०२५) — राज्य निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून, या परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य निवडणूक आयुक्त श्री. विनेशा वाघमारे हे आज दुपारी ४ वाजता मंत्रालयासमोर असलेल्या सचिवालयातील जिमखाना येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या परिषदेत आयोग आगामी निवडणुकांचा कार्यक्रम, आरक्षण प्रक्रिया, आचारसंहिता लागू होण्याची तारीख आणि निवडणुकीचे टप्पे यासंबंधी माहिती देऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकाळाची मुदत संपत असल्याने आयोगाकडून आज निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

📍 स्थळ: सचिवालय, जिमखाना, मंत्रालयासमोर, मुंबई
🕓 वेळ: दुपारी ४.०० वाजता

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement