Ad Code

Responsive Advertisement

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1, उस्मानाबाद येथे त्वचा,महिला व बालक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

उस्मानाबाद- दिनांक-27/10/2021 रोजी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1,वैराग रोड, उस्मानाबाद येथे त्वचा,महिला व बालक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते यामध्ये गरोदर मातांची नोंदणी व तपासणी,त्वचा रोग तपासणी, सर्व बालकांची तपासणी व उपचार,किशोर वयीन मुलींची तपासणी,आरोग्य शिक्षण व सल्ला,गरोदर मातांसाठी संदर्भ सेवा,मधुमेह व उच्चरक्तदाब तपासणी सल्ला व मार्गदर्शन या वरील सर्व संदर्भ सेवेकरिता आजचे महाशिबिर आयोजित केले होते.या शिबिराचे उदघाटन मा.श्री. डॉ.सी.के.ऐवळे सर,तालूका आरोग्य अधिकारी यांच्या शुभ हस्ते झाले.या कार्यक्रमास खालील वैदयकीय अधिकारी यांनी आपापल्या सेवा दिल्या.प्रथमतः नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्वे सर्वा मा.श्री.डॉ.शकील अहमद खान यांनी सर्व मान्यवरांचे शाल,श्रीफळ,बुके देऊन स्वागत केले नंतर सदर शिबिरास सुरुवात झाली.सदर शिबिरामध्ये डॉ. घोगरे सर,कुस्ट रोग ,वैदयकीय अधिकारी यांनी 113 रुग्णांची तपासणी केली,डॉ.स्वप्नाली माने मॅडम वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग तज्ञ यांनी 102 रुग्णानांची तपासणी केली, डॉ. श्रीकांत मिनीयार वैद्यकीय अधिकारी बाल रोग तज्ञ  यांनी 141 रुग्णांची तपासणी केली,तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्वे  सर्वा मा. डॉ.श्री. शकील अहमद खान सरांनी ANC तपासणी -11,जनरल तपासणी -92, तसेच BP/SHUGAR तपासणी -38 अशी एकूण मिळून -497 लाभार्थ्यांची तपासणी याशिबिरामध्ये करण्यात आली.सदर शिबिरामध्ये मोठा सहभाग म्हणजे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र- 1 चे सर्वे सर्वा मा.श्री. बाळासाहेब काकडे शिंदे मगर सुहास चव्हाण. बनसोडे फार्मसिस्ट, रत्नाकर पाटील,PHN गायकवाड मॅडम,स्टाफ शीतल गायकवाड,ANM-मुंडे,सुरवसे,शेख,बारगजे,शेटे,थोरात,तसेच आशा टीम चे अध्यक्ष श्रीमती. राहीमुनींसा शेख,त्यांची पूर्ण टीम तसेच कुस्ट रोग कर्मचारी श्री.राऊत एन.एस.कुस्ट रोग तंत्रन्य,श्री. माने बी.डी. कुस्ट रोग तंत्रन्य,श्री.यू.आर.शिंदे अवैद्यकीय पर्यवेक्षक, श्री. ए. एम.मुंडे अवैद्यकीय सहाय्यक,श्रीमती.भावले मॅडम अ वैद्यकीय सहाय्यक,श्री. एम. टी. सूर्यवंशी PMW, श्री.एस.के.पांढरे   वाहन चालक यांचा सहभाग मोठा होता.त्या नंतर सदर कार्यक्रमाचा समारोप मा.श्री. डॉ. शकील अहमद खान सरांनी सर्वांचे आभार प्रदर्शन करून ,कार्यक्रमाचा समारोप केला.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement