"स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई MPDA कायदा अंतर्गत नियोजित स्थानबध्द इसमास घेतले ताब्यात."
धाराशिव (उस्मानाबाद )- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एम. पी. डी. ए. कायद्या अंर्तगत नियोजित स्थानबध्द इसम नामे अविनाश दिलीप भोसले वय २४ वर्षे, रा. गायरान वस्ती, पाटोदा ता.जि. धाराशिव यास ताब्यात घेणेकरीता धाराशिव शहरातील साठे नगर याठिकाणी गेले होते त्यावेळी त्यास ताब्यात घेते वेळीस त्याने स्वतःचे शरीरावर चाकुने मारुन घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न व शासकिय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन त्यास ताब्यात घेवुन शासकिय रुग्णालय, धाराशिव येथे आंतररुग्ण विभागात दाखल केले. व त्याचे विरुध्द धाराशिव शहर पोलीस ठाणे याठिकाणी गुन्हा रजि.नं. ४६०/२०२३ कलम ३५३,३०९,१८९,५०६,३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.१५/१२/२०२३ रोजी रात्री सदरचा नियोजित स्थानबध्द इसम नामे अविनाश दिलीप भोसले हा उपचारादरम्यान रुग्णालयातुन पळुन गेला होता. म्हणुन त्याचेविरुध्द व त्यास पळवुन लावण्यास मदत करणारी त्याची पत्नी नामे चमेली भोसले यांचेवर धाराशिव शहर पोलीस ठाणे याठिकाणी गुन्हा रजि नं ४६३/२०२३ कलम २२४, २२५ (ब) भादवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर इसमास ताब्यात घेणेकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे यांचे मार्गदशनावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचे शोधात असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, सदरचा इसम हा भालगाव, ता. बार्शी जि.सोलापुर याठिकाणी एका शेतात लपुन बसलेला आहे अशी माहिती प्राप्त झोलेने सदर ठिकाणी स्थागुशा पोलीस पथकाने जावुन त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आला. पुढिल कायदेशीर कारवाई करीता त्यास बेंबळी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री योगेश शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर इसम हा सराईत गुन्हागार व पोलीसांवर हल्ला करण्याचा सवयीचा असुन त्याचेविरुध्द धाराशिव जिल्हात चोरी, घरफोडीचे व दरोडा अशा सदराखालील एकुण १६ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे आदेशाने व मार्गदशनावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. संदिप ओहोळ, पोलीस अंमलदार विनोद जानराव, हुसेन सय्यद, फरहाण पठाण, अमोल चव्हाण, नितीन जाधवर, बबन जाधवर, मेहबुब अरब व महिला पोलीस अंमलदार रंजना होळकर यांचे पथकाने केली आहे.
0 Comments