Ad Code

Responsive Advertisement

जीप चालकास कुऱ्हाडीने मारहाण करून महिलेचे दागिने लुटले ; उस्मानाबाद तालुक्यातील घटना

 उस्मानाबाद : जीप चालकास कुऱ्हाडीने मारहाण करून प्रवाशी महिलेचे दागिने लुटून नेल्याने मोठी खळबळ उडाली आहे . उस्मानाबाद तालुक्यातील बेगडा शिवरात शुक्रवारी ( दि . २२ ) ही घटना घडली . याप्रकरणी ४ जणाविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
 याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की कामठा येथील जमीर सय्यद पत्नी आयशा व मुलगी कियारा यांच्यासह शुक्रवारी स्कॉर्पिओ जीपमधून ( क्र . एम.एच. १४- सी सी ६५४८ ) बेगडा शिवारातील रस्त्याने प्रवास करीत होते दरम्यान सव्वाआठ वाजेच्या सुमारास ते लघुशंकेसाठी थांबले असता पाठीमागून आलेल्या अॅटोरिक्षातील अविनाश चंद्रकांत शिंदे उर्फ आवड्या याच्यासह ३ अनोळखी व्यक्तींनी सय्यद कुटूंबियास लाथाबुक्यांनी मारहाण केली . जीपचालक गिरी यांच्या हातावर कुऱ्हाडीने मारहाण करून त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली .
 यावेळी जीपमधील आयशा सय्यद यांचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व ४० ग्रॅम वजनाची सुवर्ण साखळीही त्या चौघांनी जबरदस्तीने हिसकावून घेतली . तसेच त्यांचा स्मार्टफोन व वाहनाच्या काचा फोडून आर्थिक नुकसान केले , अशी फिर्याद आयशा सय्यद यांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे . त्यावरून ४ जणाविरूध्द भादसं कलम ३ ९ ४ , ४२७ , ५०६ , ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहे

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement