Ad Code

Responsive Advertisement

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर
उस्मानाबाद,दि,22(जिमाका) धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज www.scholarship.gov.in या संकेतस्थळावर स्वीकारण्याची प्रक्रीया सुरू आहे. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2021 आहे.
पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार केंद्र शासनाने अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या पहिली ते दहावी या वर्गातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील मुस्लीम,ख्रिचन, बौध्द, शिख,पारसी आणि जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यासाठी प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2008-09 पासून सर्व माध्यमाच्या तसेच सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय, निमशासकीय, खाजगी अनुदानीत, विना अनुदानित, कायम विना अनुदानीत आणि स्वयंअर्थसहाय्यित शासनमान्यता प्राप्त शाळांकडून शिक्षण देणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यासाठी ही योजना लागू आहे.अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उर्तीण झालेला असावा.परंतु कोवीड-19 च्या प्रादुर्भावामूळे ही अट चालू वर्षासाठी नुतनीकरण विद्यार्थ्यासाठी शिथिल करण्यात आली आहे.
        पालकांचे किंवा कुंटुंबाचे एकत्रित वार्षीक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असणे आणि वार्षीक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. तसेच अर्ज भरताना विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, बँक आणि आधार माहिती अचुक भरावी. धर्माबाबतचे स्वयं घोषणा पत्र,उत्पन्नाचे प्रमाणपत्र,गुणपत्रक,  आधारकार्ड अथवा आधार नोंदणी पावती,विद्यार्थ्यांचा फोटो, बँक पासबूकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करावीत. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर अनुषंगीक शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थ्यीनीसाठी राखीव आहे.
विद्यार्थ्यी शिकत असलेल्या शाळांच्या वस्तीगृहात राहत असतील अथवा राज्य शासनाच्या वस्तीगृहात राहत असतील केवळ तेच विद्यार्थ्यी या योजनेत वस्तीगृहाचे विद्यार्थी म्हणून गणले जातात. तसेच वस्तीगृहामध्ये भरलेल्या शुल्कांच्या पावत्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करणे बंधनकारक आहे. 2020-21 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या किंवा शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि यावर्षी अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सन 2021-22 करिता नुतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.
        नवीन अथवा नुतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल. तसेच एका विद्यार्थ्याने नवीन, नुतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरविले जातील. विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेचे असावे,नसल्यास पालकांचे राष्ट्रीयकृत बँक खात्याची माहिती अर्जात भरता येईल.इयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांचे नवीन आणि नुतनीकरणाचे अर्ज National Scholarship Portal  (NSP 2.0) www. Scholarships.gov.in या संकेत स्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील. अर्ज भरण्याची सोय www.minortyaffairs.gov.in या संकेत स्थळावरसुध्दा उपलब्ध आहे.अर्ज भरताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहणे आवश्यक आहे.हा क्रमांक पालकांचा असेल तर तो दोन पाल्यासाठीच वापरता येईल.
 
*******

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement