नळदुर्ग : सात विविध घरफोडीतील अट्टल चोर मुद्देमालासह अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सुरज शिंदे असे या अट्टल चोराचे नाव आहे.
स्था.गु.शा. च्या पोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- शैलेश पवार, पोउपनि- . पांडुरंग माने, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- योगेश कोळी, बबन जाधवर, अविनाश मारलापल्ले, आरसेवाड यांच्या पथकाने दि. 27.10.2021 रोजी हंगरगा फाटा येथील सुरज शिंदे यास गोपनीय खबरेच्या आधारे ताब्यात घेतले
त्याच्या ताब्यात 91 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळल्याने त्या बाबत तो सविस्तर माहिती देउ शकला नाही. पोलीसांनी अभिलेख अभ्यासले असता नळदुर्ग पो.ठा. 234, 235, 324, 325 / 2021, लोहारा- 144, 183 / 2021 व तुळजापूर पो.ठा. 286 / 2021 अशा 7 घरफोडींच्या गुन्ह्यातील ते दागिने असल्याचे निष्पन्न झाले.
0 Comments