Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद शहरातील तीन उद्यानांसाठी सात कोटींचा निधी मंजूर; आमदार कैलास पाटील यांची माहिती


उस्मानाबाद शहरातील तीन उद्यानांसाठी सात कोटींचा निधी मंजूर; आमदार कैलास पाटील यांची माहिती


उस्मानाबाद - वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत उस्मानाबाद शहरातील दोन उद्यानाच्या विकासासाठी आणि एका नव्याने करण्यात येणाऱ्या उद्यानासाठी सात कोटींचा निधी नगरविकास विभागाने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली.

 शिवसेनेचे पालकमंत्री शंकरराव गडाख, आमदार प्रा. तानाजीराव सावत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी नगर विकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने निधी मंजूर करण्यात आला आहे. 

या निधीतून शहरातील राष्ट्रमाता जिजामाता उद्यान, छत्रपती संभाजी महाराज उद्यान या दोन उद्यानाचा विकास करण्यात येणार असून, नगर परिषद शाळा क्रमांक 18 येथे नव्याने उद्यान विकसित करण्यात येणार आहे.

राज्यातील नगर परिषदाना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत उस्मानाबाद नगरपालिकेला सात कोटींचा निधी नगर विकास विभागाने मंजूर केला आहे. या मंजूर निधीतून शहरातील राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाच्या विकासासाठी तीन कोटी रुपये, नगरपालिका शाळा क्रमांक 11 जवळील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या विकासासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर नगरपालिका शाळा क्रमांक 18 जवळ नवीन उद्यान विकसित करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement