बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधील ३० ग्रॅम सोन्यासह १० हजारांची रोकड पळवली, उस्मानाबाद शहरातील घटना
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील शोभा अहिरे या दि. 01.11.2021 रोजी 14.00 वा. उस्मानाबाद बस स्थानकातील बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांची पर्स उघडून आतील 30 ग्रॅम सुवर्ण दागिन्यांसह 10,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या शोभा अहिरे यांनी दि. 04.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.घराच्या पडवीतील 30 पोती सोयाबीन चोरी
उस्मानाबाद : सांजा चौक, उस्मानाबाद येथील अकबर शेख यांनी त्यांच्या घराच्या पडवीतील 30 पोती सोयाबीन अज्ञात व्यक्तीने दि. 03- 04.11.2021 दरम्यानच्या रात्री चोरुन नेली. अशा मजकुराच्या अकबर शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments