याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , जिल्ह्यातील चोरी व दरोड्याच्या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहिती काढून अजय श्रावण शिंदे ( वय २१ ) व सुनिल उर्फ काळ्या श्रावण शिंदे ( वय २३ , दोघे रा . सुभा , ह.मु. उस्मानाबाद ) यांना एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून ताब्यात घेतले . त्यांनी चोरी व दरोड्याचे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले आहे . पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल ( किंमत ९ ० हजार ) व चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे २० ग्रॅम वजनाचे मिनी गंठन ( किंमत ९ ६ हजार ) , १५ ग्रॅमचे गंठण ( ७४ हजार रुपये ) , १० ग्रॅमचे मंगळसूत्र ( ४८ हजार ) , २ ग्रॅमचे मणी ( १० हजार ) , कडे ( १० हजार ) , विविध कंपनीचे १६ ॲन्ड्राईड मोबाईल ( १ लाख ८४ हजार रुपये ) , चोरीची मोटारसायकल ( २० हजार ) , गुन्ह्यासाठी वापरलेले कटर टॉमी , कटावणी ( किंमत ३ हजार ) असा एकूण ५ लाख ३५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे . त्या दोघांनी किरण श्रीमंत भोसले ( रा . मानमोडी ) , डुम्या श्रीमंत भोसले , अजय किरण भोसले ( झाडी बोरगाव ता . बार्शी ) , हण्या शहाजी शिंदे ( रा . लाडूळा , ता . बार्शी ) यांच्या मदतीने हे गुन्हे केले आहेत . यात उस्मानाबाद ग्रामीण २. ढोकी , येरमाळा व सोलापूर जिल्ह्यातील माढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे . अटकेतील अजय शिंदे हा उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील चोरी , दरोड्यांच्या १२ गुन्ह्यामध्ये पोलिसांना हवा होता . सुनिल शिंदे हा उस्मानाबाद व तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीतील ६ गुन्ह्याप्रकरणी पोलिसांना हवा होता . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश पवार , पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने , पोना हुसेन सय्यद , अमोल चव्हाण , मपोना शैला टेळे , पोकों अशोक ढगारे , बबन जाधवर , अविनाश मरलापल्ले , रविंद्र आरशेवाड , साईनाथ असमोड , पोहेकॉ मेहबूब अरब , चालक आनंद गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली .
0 Comments