व्यवसायानिमित्त मोहा येथील एक कुटूंब घाना देशात स्थायिक होते . जगातील इतर देशांसोबतच घाना याही देशात ओमायक्रॉनने डोके वर काढले आहे . त्यामुळे हे कुटूंब चार - पाच दिवसांपूर्वी हायरिस्क असलेल्या घाना देशातून विमानाने थेट दिल्लीत उतरले होते . सर्वांची टेस्ट केली असता , रिपोर्ट निगेटिव्ह आला होता . यानंतर हे कुटुंब मोहा येथे दाखल झाले . राज्यस्तरीय कार्यालयाकडून संबंधित कुटुंबाची माहिती आरोग्य विभागाला समजल्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली .
या चाचणीत बाप - लेकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता . त्यामुळे या दोघांनाही जिल्हा रूग्णालयात भरती करून उपचार सुरू केले होते . तसेच ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी सॅम्पल पुणे येथे पाठविले होते . हा अहवाल गुरूवारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला . त्यानुसार बाप - लेकास ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे . यापूर्वी उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथे तीन रूग्ण आढळून आले आहेत . त्यामुळे आता उस्मानाबाद जिल्ह्यात ओमिक्रोन रुग्णाची संख्या झाली आहे
0 Comments