Ad Code

Responsive Advertisement

वयोवृद्ध रुग्णाच्या मदतीसाठी समाजसेविका आशाताईंचे मोलाचे योगदान; चेहऱ्यावर फुलले हास्य

धाराशिव : वयोवृद्ध रुग्णाच्या मदतीसाठी समाजसेविका आशाताईंचे मोलाचे योगदान; चेहऱ्यावर फुलले हास्य
धाराशिव - चेन्नई येथील वयोवृद्ध मुथुराम लिंगम हे धाराशिव शहरातील भाई उद्धवराव पाटील शाळेजवळ बेवारस अवस्थेत आढळून आले. रात्री 10:30 वाजता जिल्हा सत्र न्यायालयातील अॅडव्होकेट अश्विनी सोनटक्के यांनी समाजसेविका आशाताई कांबळे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आशाताईंनी तत्काळ डॉ. गपाट सर आणि त्यांच्या हॉस्पिटलमधील नर्स अनुजा ताईंशी संपर्क साधून तातडीची मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या वृद्धाने त्यावेळी मदतीला नकार दिला.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता आशाताई,अश्विनीताई सोनटक्के आणि त्यांची बहीण दिव्या ताई सोनटक्के यांनी पुन्हा त्या वृद्धाला भेट दिली. आनंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अजहर काझी साहेब यांनाही तेथे बोलावण्यात आले. त्यांना पाहून गर्दी झाली. गर्दीतील माजी नगरसेवक अभिजित काकडे व सामाजिक कार्यकर्ते बालाजी तांबे यांनीही चौकशी केली असता, त्या वृद्धाने स्वतःच्या खिशातून एक व्हिजिटिंग कार्ड काढून दिले.

वृद्धाच्या पायाला जखम असल्याचे लक्षात येताच आशाताईंनी 108 वर कॉल करून अॅम्ब्युलन्स बोलावली. मात्र, त्यांनी हॉस्पिटलला जाण्यास नकार दिला. रिक्षा बोलावली गेली, परंतु रिक्षाचालकाने वृद्धाला नेण्यास नकार दिला. पुन्हा एकदा अॅम्ब्युलन्स मागवण्यात आली. अखेर बालाजी तांबे, काझी साहेब आणि अभिजित काकडे यांच्या मदतीने त्या वृद्धाला अॅम्ब्युलन्समध्ये बसवण्यात आले. आशाताई स्वतः अॅम्ब्युलन्समध्ये त्यांच्यासोबत होत्या, तर अश्विनी व दिव्या सोनटक्के स्कुटीवर मागून आल्या.
शासकीय रुग्णालय धाराशिव येथे वैद्यकीय समाजसेवा अधिकारी नवनाथ सरवदे, महेश अटकळ व डॉ. निपाणीकर यांच्या सहकार्याने रुग्णाला दाखल करण्यात आले. दाखल करताना नातेवाईकांचा शोध लागेपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज देऊ नये, अशी विनंती करण्यात आली.

या प्रक्रियेनंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वृद्धाच्या चेन्नईतील नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. अखेर 13 जुलै 2025 रोजी रुग्णाचे मुलगा आणि सून धाराशिव येथे आले व त्यांना रुग्णाचा ताबा देण्यात आला. भाषा आणि प्रदेश वेगळा असतानाही धाराशिवकरांच्या माणुसकीच्या प्रयत्नातून सदर वयोवृद्ध व्यक्तीला आपल्या कुटुंबाशी पुन्हा भेट घडली.

या संपूर्ण घटनाक्रमानध्ये समाजसेविका आशाताई कांबळे, अॅडव्होकेट अश्विनी सोनटक्के व दिव्या सोनटक्के यांचे मोलाचे योगदान होते. तसेच आनंदनगर पोलीस स्टेशन, शासकीय रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दाखवलेली तत्परता व माणुसकी हा समाजासाठी आदर्श आहे.

या प्रकरणात आर्थोपेडिक विभागाचे विभागप्रमुख डॉ. बालाजी बाराते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. साहील गांधी, डॉ. बिनसागर पुडीकेल, तसेच स्टाफ नर्सेसनी रुग्णावर यशस्वी उपचार केले. ट्रॉमा वॉर्डच्या इन्चार्ज जयश्री धारेकर आणि भाग्यशाली पूरी यांच्या मार्गदर्शनाखाली मनिषा गायकवाड, माधुरी वाघे, सायली हाजगुडे, मनिषा माळी, संगीता रेनापुरे, यास्मिन मुल्ला, नितीश शेंदारकर व कक्षसेवक दादा माळी यांनी देखील रुग्णसेवा केली.

रुग्णाचे पुनर्वसन त्याच्या घरी व्यवस्थित होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, आशाताई कांबळे, अॅड. अश्विनी सोनटक्के, प्रा. दिव्या सोनटक्के, पो. अजहर काझी, शिक्षक बाळाजी तांबे, तसेच ब्लड बँक धाराशिवचे समाजसेवा अधीक्षक तिरुपती केंद्रे आणि इन्चार्ज सिस्टर निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement