धाराशिव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या धाराशिव तालुका उपाध्यक्षपदी बिलाल अखलाक रझवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना हे नियुक्तीपत्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मा. अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य निहाल काजी, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष मतीन (मंजूर) पटेल, पटेल सर, माजी नगर अध्यक्ष अमित शिंदे, भारतीय युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निहाल काझी, अलीम पठाण, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा धाराशिव शहराध्यक्ष फरमान काझी, मेहमूद मुजावर, जाकीर पठाण, भाजपा शहर अल्पसंख्यांक उपाध्यक्ष फहाद सिद्दिकी, रय्यान रझवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व पक्ष धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. नियुक्तीनंतर बिलाल रझवी यांचा उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments