बुधवारी या दोघांचाही अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे . यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे कोरोना पॉझिटिव आढळून आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे . दरम्यान नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी . घाबरून जाऊ नये , असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे . खबरदारीचा उपाय म्हणून बावी गावातील सीमा सील केल्या आहेत . तसेच गावातून इतर ठिकाणी संसर्ग होऊ नये याची प्रशासनाकडून दखल घेतली जात आहे . मराठवाड्यात लातूर येथील ओमिक्रॉन रुग्ण आढळून आल्यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात ही दोन पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे .
0 Comments