Ad Code

Responsive Advertisement

दहावी व बारावीच्या लेखी परिक्षेबाबत सूचना


       *दहावी व बारावीच्या लेखी परिक्षेबाबत सूचना*
*उस्मानाबाद*:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी ) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी ) परीक्षांचे वेळापत्रकानुसार लेखी परीक्षा पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात येणार आहेत. 
तपशील व लेखी परीक्षा कालावधी-1)उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा कालावधी दि.04 मार्च 2022 (शुक्रवार) ते दि.30 मार्च 2022 (बुधवार),2)माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा- लेखी परीक्षा कालावधी दि.15 मार्च 2022 (मंगळवार) ते दि.04 एप्रिल 2022 (सोमवार) या कालावधीमध्ये आयोजित केलेली दिनांकानिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.21 डिसेंबर 2021 पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा,उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल,त्या छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे,अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटसॲप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राहय धरु नये. 
        प्रात्यक्षिक परीक्षा,श्रेणी,तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा,कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल,सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी,असे आवाहन विभागीय सचिव,लातूर विभागीय मंडळ,लातूर यांनी कळविले आहे.
                                      ****

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement