Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद जिल्ह्याचे क्रिकेटपटू राजवर्धनवर दीड कोटींची आयपीएल मध्ये बोली

उस्मानाबाद:- आयपीएल लिलावाच्या दुस-या दिवशी १९ वर्षाखालील भारतीय संघातील चार खेळाडूंवर सर्वांचे लक्ष होते. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या हट्टाकट्टा राजवर्धन हंगरगेकरचाही समावेश होता. ज्यावेळी राजवर्धनचे नाव लिलावासाठी पुकारण्यात आले त्यावेळी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये त्याला आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ निर्माण झाली होती. मात्र अखेर महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारत ३० लाख बेस प्राईस असलेल्या राजवर्धनसाठी १.५ कोटी रूपये बोली बोलून आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे.

राजवर्धन हंगरगेकर वेगवान गोलंदाज
राजवर्धन हंगरगेकर हा वेगवान गोलंदाज आणि आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. त्याने १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये अनेक सामन्यात स्लॉग ओव्हरमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली होती. याचबरोबर तो वेगाने गोलंदाजी करणे पसंत करतो. आता ऋतुराज गायकवाड पाठोपाठ तोही चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीच्या सानिध्यात आलेल्या ऋतुराज गायकवाडचा कायापालट झाला आहे. आता राजवर्धन हंगरगेकरकडेही अशीच धोनीच्या मुशीत तयार होण्याची संधी आहे

भारताने नुकाताच विक्रमी पाचव्यांदा १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला. या संघातील दमदार कामगिरी करणा-या चार खेळाडूंनी यंदाच्या आयपीएल लिलावात उतरले होते. त्यातील राज बावाला सर्वाधिक २ कोटीची बोली लागली. तर महाराष्ट्राच्या राजवर्धन हंगरगेकरनेही कोटीचा आकडा पार केले. त्याला सीएसकेने १.५ कोटी रूपयांची बोली लावून आपल्या संघात सामावून घेतले.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement