Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात दोन जणांचा जागीच मृत्यू

उस्मानाबाद येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात दोन जणांचा जागीच मृत्यू


उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील चोराखळी नजिक राष्ट्रीय महामार्ग  वर झालेल्या विचित्र अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ७ जणांना उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रादेशिक परिवहन विभागचे कर्मचारी चोराखळी कडे जात असताना गाय आडवी आली आणि त्या वाहनाचा ताबा सुटून दुसऱ्या बाजूस असलेल्या स्विफ्ट डिझायर या गाडीला जाऊन धडकली या अपघातात महिलेचा ( निर्मला गोळे) यांचा  जागीच  मृत्यू झाला तर इतरांना शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे उपचारासाठी आणले त्यातील काहीना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन महिला, तीन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तर प्रादेशिक परिवहन विभागाचे चालक बाळासाहेब काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement