उस्मानाबाद - उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांना ठाण्यात स्नेहभोजनासाठी बोलविण्यात आले. सहकारी आमदारांसह ते पोहोचले. रात्री उशिरा सर्व आमदारांसह त्यांनाही गाडीत बसवून थेट मुंबई बाहेर घेऊन जात असताना पाटील यांच्या मनात पाल चुकचुकली. गाडीत बसतानाच त्यांचा फोन काढून घेण्यात आला. रात्रीच्या अंधारात गाडी गुजरातच्या दिशेने जात होती. ‘ना बोलता येईना ना कुणाला मदत मागता येईना,’अशा अवघडलेल्या अवस्थेत ते गप्प बसून राहिले
गुजरात सीमेवर पोलिसांचा ताफा होता. त्या दरम्यान गाडी चहापानासाठी थांबली असता कैलास पाटील यांनी लघुशंकेच्या निमित्ताने अंधारात धूम ठोकली. पावसात ते रस्त्यावरून धावत होते. एका ट्रकमध्ये बसून ते मुंबईच्या दिशेने सुमारे चाळीस किलोमीटरपर्यंत आले. ट्रक दुसऱ्या बाजूने जाणार असल्याने ते उतरले. वाहनचालकांकडे लिफ्ट मागत पाटील यांनी मुंबई गाठली. आज सकाळी ते थेट ‘मातोश्री’वर दाखल झाले अन धाय मोकलून रडू लागले. हा सगळा प्रसंग त्यांनी ठाकरे यांना सांगितला
0 Comments