Ad Code

Responsive Advertisement

मोठी बातमी : एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

 मोठी बातमी : एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

 
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होत असताना आता नवीन सरकार स्थापनेची कसरत जोरात सुरू झाली आहे. काल रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होत. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा राज्यपालनाकडे सुपूर्द केला उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने एकनाथ शिंदे आणि भाजपने राज्यात नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे.
 
संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. यानंतर आता थोड्या वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह येत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा गट आमच्या सोबत आला आहे. अजूनही अपक्ष आमच्यासोबत आले आहेत. याबाबतचं पत्र आम्ही राज्यपालांना देणार असल्याचं देखील ते म्हणाले._

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement