Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद शिवसेना माजी तालुका अध्यक्ष दिलीप जावळे यांचा निधन

शिवसेना नेते दिलीप जावळे यांचे निधन

उस्मानाबाद : शिवसेना नेते तथा उस्मानाबादचे माजी तालुकाप्रमुख दिलीप भगवान जावळे यांचे सोलापूर येथे उपचारादरम्यान रविवारी (दि.17) सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी दुपारी 1 वाजता सांगवी (ता. उस्मानाबाद) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिलीप जावळे यांनी विद्यार्थी दशेपासूनच शिवसैनिक म्हणून काम केले आहे. त्यांनी सांगवी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य या पदावर काम करुन गावासह परिसरातील गोरगरिबांना सहकार्य केले आहे. त्यामुळे पक्षाकडूनही त्यांना शिवसेना उस्मानाबाद तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. शिवाय ते पक्षाचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांची तालुकाभरात ओळख होती. दिलीप जावळे यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरु होते. यावेळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगवी, कामेगाव, समुद्रवाणी, घुगी, राजुरी, लासोना या गावामधून शोककळा व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर सोमवारी (दि.18) दुपारी एक वाजता सांगवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement