उस्मानाबाद चे सुपत्र प्रा.डॉ. रमेश दापके-देशमुख यांचा सोलापूर येथे विशेष सन्मान
येथे दक्षिण सोलापूर तालुका मराठी पत्रकार संघ व स्वर्गीय महादेवजी रुपनुरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २०ऑगस्ट २०२२ रोजी दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समिती आवारातील विसावा सभागृहात उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक- सचिव प्रा. डॉ. रमेश दापके-देशमुख यांना मा.सहकार मंत्री आ.सुभाष देशमुख व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तेव्हा दक्षिण सोलापूर तालुका मराठी पत्रकार संघ व स्वर्गीय महादेवजी रुपनुरे प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments