औरंगाबाद उस्मानाबाद नामांतरच्या प्रस्तावाला विधानसभेत मंजूरी मुख्यमंत्रीची घोषणा
मुंबई: तत्कालिन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि मुंबईतील विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला होता. पण, शिंदे सरकार आल्यानंतर हा निर्णय स्थगित करण्यात आला. पण, आता अधिवेशनात नव्याने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत तीन प्रस्ताव मांडले, ते प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले. यात औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आले आहे. तसेच, उस्मानाबादचे नाव धारशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि.बा. पाटील असे करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे.
नामांतर च्या निर्णय च्या विरुद्ध औरंगाबाद आणि उस्मानाबाद चे नागरिकाकडून बॉम्बे हायकोर्ट याचिका दाखल करण्यात आलेली आहे.
0 Comments