लॉजमध्ये अनैतिक वेश्याव्यवसाय; दोघांना अटक, दोन महिलांची सुटका!
तुळजापूर : लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी लॉजवर छापा टाकून लॉजच्या व्यवस्थापकासह दोघांना अटक केली. यावेळी पीडित दोन महिलांची सुटका करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (१२) तुळजापुरात ही कारवाई केली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर शहरातील घाटशील वाहन पार्किंगजवळ असलेल्या भक्त निवास व लॉजचे लॉज व्यवस्थापक व व्यवस्थापक हॉटेलमधील काही महिलांमार्फत वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे बनावट ग्राहक पाठवून बातमीची पुष्टी केली. लॉजवर संध्याकाळ. 17.30 च्या सुमारास छापा टाकला असता, लॉजच्या दोन खोल्यांमध्ये 2 प्रौढ महिला आढळून आल्या. महिला पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, लॉजचे संचालक आणि व्यवस्थापक 2 महिलांना व्यावसायिक कारणासाठी आश्रय देऊन आणि त्यांना अनैतिकतेपासून परावृत्त करून उदरनिर्वाह करत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी पोलिसांनी लाज चालकासह दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल फोन व 2 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी लॉज चालक आणि संबंधित वेश्याव्यवसाय लॉजमधील पीडित दोन महिलांविरुद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कवट यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सपोनि मनोज निलंगेकर, तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण, पोहेकाओ जावेद काझी, उलिउल्ला काझी, प्रवीण काळे, अॅड. दिलीप जगदाळे, सुभाष चौरे, धनंजय कवडे, शौकत पठाण, शैला तेले, वैशाली सोनवणे, रंजना होळकर, बलदेव ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments