पुण्याच्या तहसीलदारांनी विमा कंपनीला नोटीस बजावली, ७ दिवसांत रक्कम जमा करण्याचे आदेश...
उस्मानाबाद - खरीप २०२० मधील हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीची संपूर्ण भरपाई विमा कंपनीने अजूनही दिली नाही. आणखीनही कंपनीकडून एकूण ३४४ कोटी रुपये येणे आहेत. ते मिळावे अशी मागणी उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी आंदोलनात केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना पत्र देऊन जमीन महसूल अधिनियमाच्या अंतर्गत कंपनीच्या मालमत्ता जप्त करीत रकमेची वसुली करावी, अशी विनंती केली. यानंतर आमदार कैलास पाटील यांनी स्वतः पुणे जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांची नुकतीच भेट घेऊन कार्यवाहीस गती देण्याची विनंती केली होती. त्यानुसार पुणे तहसीलदार यांनी विमा कंपनीचे कार्यकारी संचालक आशिष अग्रवाल यांना नोटीस पाठवून ७ दिवसांत उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थकबाकी जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
जोपर्यंत ही रक्कम वसूल होऊन आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होत नाही, तोपर्यंत आपला लढा, पाठपुरावा असाच कायम राहणार...
0 Comments