Ad Code

Responsive Advertisement

अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष

अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर  शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष

 

उस्मानाबाद दि.९ (प्रतिनिधी) - पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणांमध्ये अडकलेले शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबई येथील सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने दि.९ नोव्हेंबर रोजी फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खा. राऊत यांच्या जामीन अर्जावर आतापर्यंत मुंबई न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. परंतू अखेर दि.९ नोव्हेंबर रोजी खा. राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्तामध्ये प्रचंड जल्लोष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले

 कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खा राऊत यांना अटक झाल्यापासून राज्यात वेगवेगळ्या घडामोडींनी जोर धरला होता. सत्ता स्थापनेसाठी असलेला संघर्ष संपून १०० दिवस उलटले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायाधीश देशपांडे यांनी खा राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला. यावेळी कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेरच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

   मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी.एम.एल. ए. न्यायालयाने खा. राऊत यांच्या जामीन अर्जावर अद्यापपर्यंत निर्णय प्रलंबित ठेवला होता.  त्यामुळे आजच्या सुनावणीकडे राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. त्यावर सुनावणी झाली असता खा राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे.

   राज्यात काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन व्यवहार प्रकरणांमध्ये शिवसेनेचे नेते खा राऊत यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) ने जूनमध्ये ताब्यात घेतले होते. बरेच दिवस चौकशी होऊन नंतर खा राऊत यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. संजय राऊत यांचा मुक्काम हा ऑर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला होता. मात्र अखेर न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केल्याने उस्मानाबाद येथील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळेजिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुखदिलीप पाटीलमाजी नगरसेवक बाळासाहेब काकडे,  उपशहर प्रमुख बंडू आदरकरमाजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटेनपचे माजी गटनेते सोमनाथ गुरवएच. एम. देवकतेमाजी पंस सदस्य संग्राम देशमुखपंकज पाटीलरवी वाघमारेगणेश खोचरेअतिश पाटीलसुरेश गवळीमनोज केजकर, छोटा साजिद, गफूर शेखमनोज साठेदिनेश बंडगरकृष्णा साळुंकेगणेश साळुंकेसंकेत सुर्यवंशीरवी कोरेपिंटू आंबेकरसादिक शेखमहेश लिमयेसत्यजित पडवळविजय ढोणेसतीश लोंढेबापू पडवळनिलेश साळुंके आदीसह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement