युनानीच्या विविध प्रश्नासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर शकील खान यांचा सत्कार
उस्मानाबाद - युनानी डॉक्टरांचे प्रश्न शहर स्तरावर किंवा राज्य स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर सरकारसमोर मांडले जात आहेत..अलिकडेच शिष्टमंडळ डॉ.शकील अहमद खान यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात शासकीय युनानी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी परिश्रम घेतले होते आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे उस्मानाबाद येथील शेख बदियोद्दिन (पीपल्स टेलर), शेख अल्तमश अभियंता यांनी डॉक्टर शकील खान यांचा सत्कार केला यावेळी साप्ताहिक युवा मशालचे कार्यकारी संपादक शेख जफर रब्बानी, मुख्य समय न्यूज पोर्टल चे संपादक शहबाज शेख, घोणसे पाटील फवाद रजवी, ताजुद्दीन मुजावर आदि मान्यवर उपस्थित होते
0 Comments