Ad Code

Responsive Advertisement

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कसबे तडवळे येथील भव्य असे स्मारक बांधकामाचा मार्ग मोकळा - डॉ. सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी उस्मानाबाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कसबे तडवळे येथील भव्य असे स्मारक बांधकामाचा मार्ग मोकळा - डॉ. सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी उस्मानाबाद
उस्मानाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे या अंतर्गत मौजे कसबे तडवळे जि. उस्मानाबाद येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुक्काम केलेल्या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय, क्रांतीस्तंभ व परिसरातील नुतनीकरणास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ऑक्टोबर २०१५ मध्ये मंजूरी देण्यात येवून रक्कम रू.०१ कोटी इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली होती

 परंतु, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सद्यस्थितीत जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळा सुरू असल्यामुळे सदर विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शाळेकरिता इतरत्र जागा उपलब्ध करून दिल्याशिवाय सदर ठिकाणी सार्वजनिक वाचनालय, क्रांतीस्तंभ व परिसर सुशोभिकरण करण्याचे काम गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित होते.

 सदर शाळेस जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न व पाठपुरावा केल्यामुळे कसबे तडवळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची जागा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कसबे तडवळे या शाळेच्या इमारत बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यास सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक ०५ जानेवारी २०२३ रोजी पूर्वमान्यता दिलेली आहे.

 त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुक्काम केलेल्या ठिकाणी त्यांचे भव्य असे स्मारक बांधकामाचा मार्ग मोकळा झालेला आहे असे  डॉ. सचिन ओम्बासे
 जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी प्रेस नोट द्वारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement