Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली रॅली व मिरवणूकीच्या मार्गाची पाहणी



जिल्हाधिका-यांनी केली रॅली व मिरवणूकीच्या मार्गाची पाहणी
उस्मानाबाद,दि,17(जिमाका): 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठकही नुक्तीच घेण्यात आली. याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती शिवजयंती समिती व शिव राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने निघणाऱ्या मोटर सायकल रॅली, ऑटो रिक्षा रॅली आणि मिरवणूकीच्या मार्गाची पाहणी केली. शिवजन्मोत्सवाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व मार्गावरील अडथळे दूर व्हावे यासाठी ही पाहणी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी उपस्थित अधिका-यांना आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार गणेश माळी, शहर पोलीस निरीक्षक उस्मान शेख, आनंद नगरचे पोलीस निरीक्षक श्री.पारेकर, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड आदींसह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
****

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement