Ad Code

Responsive Advertisement

जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीमध्ये असमतोलपणा अजिबातच झालेला नाही - साळुंके

जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीमध्ये असमतोलपणा अजिबातच झालेला नाही - साळुंके

आ  पाटील यांच्या...त्या...पत्रात तथ्य नाहीच


उस्मानाबाद दि.१७ (प्रतिनिधी) - जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील रस्ते विकास निधी वाटप चारही विधानसभा मतदारसंघासाठी पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी समान पद्धतीने केलेला आहे. मात्र या निधी वाटपामध्ये समतोलपणा झाला असल्याचा आरोप आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केला आहे. तो आरोप खोडसाळपणाने, अतिशय चुकीचा, साफ खोटा व गैरसमजातून केला असल्याचा पलटवार शिवसेना (बाळासाहेब) चे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता साळुंके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.१७ फेब्रुवारी रोजी केला.
उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, मोहन पणूरे व तालुकाप्रमुख अजित लाकाळ, सनी पवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना साळुंके म्हणाले की, पुढे बोलताना साळुंके म्हणाले की, पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी २०२२ चा नियोजन समितीच्या माध्यमातून रस्ते विकास कामांसाठी उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा-उमरगा व परंडा-भूम-वाशी या चार मतदार संघासाठी रस्ते विकास निधीचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी समान पद्धतीने वाटप केलेले आहे. तर ७० निधी वाटप केला असून उर्वरित ३० टक्के निधी ऐनवेळच्या इतर कामांसाठी राखीव ठेवलेला आहे. मात्र आजपर्यंत वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत २०१७-१८ मध्ये परंडा-भूम-वाशी मतदारसंघासाठी १३ लाख २० हजार तर उस्मानाबाद - कळंब मतदार संघासाठी १९ लाख २० हजार व तुळजापूर मतदार संघासाठी १० लाख ८० हजार तर लोहारा-उमरगा ३४ लाख ८० हजार रुपये तसेच २०१८-१९ मध्ये परंडा-भूम-वाशी मतदारसंघासाठी ६१ लाख तर उस्मानाबाद - कळंब मतदार संघासाठी ५० लाख व तुळजापूर मतदार संघासाठी ७७ लाख ५० हजार तर लोहारा-उमरगा १११ लाख ५० हजार रुपये तसेच २०१९-२० मध्ये मध्ये परंडा-भूम-वाशी मतदारसंघासाठी ४७ लाख तर उस्मानाबाद - कळंब मतदार संघासाठी ९५ लाख व तुळजापूर मतदार संघासाठी ८९ लाख तर लोहारा-उमरगा १६९ लाख रुपये तसेच २०२०-२१ मध्ये परंडा-भूम-वाशी मतदारसंघासाठी १५० लाख तर उस्मानाबाद - कळंब मतदार संघासाठी २८५ लाख व तुळजापूर मतदार संघासाठी २१३ लाख तर लोहारा-उमरगा ४०३ लाख रुपये तसेच २०२१-२२ मध्ये परंडा-भूम-वाशी मतदारसंघासाठी १४३ लाख ३२ हजार तर उस्मानाबाद - कळंब मतदार संघासाठी ३१७ लाख ५० हजार व तुळजापूर मतदार संघासाठी २९६ लाख तर लोहारा-उमरगा ४८४ लाख ५० हजार रुपये अशा निधीचे वाटप केले आहे. यामध्ये परंडा-भूम-वाशी या मतदारसंघावर आमदार राणा पाटील यांच्यासह आ कैलास पाटील व खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अन्याय केलेला आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement