Ad Code

Responsive Advertisement

लाच लुचपत प्रतिबंधक पथकाची मोठी कारवाई; सरपंच पतीला एक लाख रुपयाची लाज घेताना रंगेहात पकडला

लाच लुचपत प्रतिबंधक पथकाची मोठी कारवाई; सरपंच पतीला एक लाख रुपयाची लाज घेताना रंगेहात पकडला
उस्मानाबाद - (प्रतिनिधि) जल जीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ योजनेचे 18 लाख रुपये किमतीचे काम रोहकल तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील तीन वस्तीवर चालू असून ते काम थांबवून यातील आरोपी हनुमंत पांडुरंग कोलते व 43 वर्षे (सरपंच चे पती) व्यवसाय शेती राहणार रोहाकल ता. परंडा जि. उस्मानाबाद यांनी सदर योजनेचे काम पूर्ववत चालू करून देण्यासाठी यातील तक्रारदार मेलकर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये साईड सुपरवायझर म्हणून नेमणूक असलेले कर्मचारी यांना दिनांक 22 मार्च 2023 रोजी चालू असलेल्या तिन्ही कामाचे प्रत्येकी 50,000 रुपये प्रमाणे दीड लाख रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य अशा लाचेची मागणी पंचा समक्ष करून तडजोडी अंती एक लाख रुपये लाचेची रक्कम जिल्हा परिषद उपहारगृह उस्मानाबाद येथे पंचा समक्ष स्वीकारल्याने आरोपी यांना ताब्यात घेऊन आनंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, सदरील सापळा हा संदीप अठोळे पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. औरंगाबाद आणि विशाल खांबे अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वी. औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे पोलीस उपाधीक्षक ला. प्र.वी उस्मानाबाद यांच्या पथकाने केले आहे,

 या कारवाईत पोलिस अंमलदार दिनकर उगलमुगले, इफ्तेकार शेख, सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावस्कर आदी कर्मचारी होते, तसेच ला. प्र.वी कडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर 02472222879 आणि टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement