Ad Code

Responsive Advertisement

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या उस्मानाबाद शहराध्यक्षपदी इरशाद कुरेशी यांची निवड

  ऑल इंडिया मुस्लीम ओ.बी.सी.अॉर्गेनायझेशन जिल्हा शाखा उस्मानाबादची जिल्हा कार्यकारीणीची बैठक संपन्न.        
       
उस्मानाबाद - अॉल इंडिया मुस्लीम ओ.बी.सी. अॉर्गेनायझेशनची जिल्हा कार्यकारीणी बैठक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शब्बीर अंन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.त्यावेळी शब्बीर अंन्सारी यांनी संघटनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच जातीचे दाखले काढण्यासाठी जे शासन आम्हाला  अधिकार देत होते त्याबद्दलही मार्गदर्शन केले तसेच संघटनामार्फत जेवढे जी.आर. काढले गेले त्याविषयी संपुर्ण माहिती देण्यात आली.जिल्हाध्यक्ष मौलाना अलीमोद्दीन यांनी प्रस्तावना करुन जिल्हा संघटनेच्या कार्यकारीणीची जाहीर करण्यात आली आहे
यावेळी उस्मानाबाद शहराध्यक्षपदी मोहम्मद इर्शाद कुरेशी,तर जिल्हा उपाध्यक्षपदी हाजी मुस्ताक कुरेशी, शहर उपाध्यक्षपदी महम्मद मुजावर,व जुनेद नदाफ, तुळजापूर तालुका अध्यक्षपदी हाजी मलंग रांची निवड करण्यात आली आहे
याप्रसंगी नगरसेवक बाबा मुजावर ,खलील सय्यद सर जाकीर भाई
 यांची प्रमुख उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना अलीमुद्दीन यांनी केले तरी आभार प्रदर्शन युवा जिल्हा अध्यक्ष इम्तियाज बागवान यांनी केले

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement