Ad Code

Responsive Advertisement

धक्कादायक ; महाराष्ट्रात H3N2 व्हायरसच्या पहिल्या रूग्णाचा मृत्यू !

धक्कादायक ; महाराष्ट्रात H3N2 व्हायरसच्या पहिल्या रूग्णाचा मृत्यू !
अहमदनगर - राज्यासह देशभरात कोरोनाचे थैमान सुरु होते. कोरोना महामारीनंतर आता एच 3एन 2 इन्फ्युएन्झा व्हायरसचा शिरकाव झाला आहे. देशभरात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पुण्यानंतर नागपुरातही या व्हायरसने ग्रासलेले रुग्ण आढळत आहेत.
देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
H3N2 या व्हायरसची लागण झालेल्या एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा अहमदनगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे अहवाल प्रलंबित आहे. मृत औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून मृत्यू झालेला तरुण नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता.

H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने आता आरोग्य विभाग अलर्ट होत असतांना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement