Ad Code

Responsive Advertisement

न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत धाराशिव नावाचा वापर करण्यात येवू नये -अपर जिल्हा दंडाधिकारी



न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत धाराशिव नावाचा वापर करण्यात येवू नये -अपर जिल्हा दंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे
 उस्मानाबाद,दि,22(जिमाका):- उस्मानाबाद जिल्हयाचे नाव बदलून धाराशिव करण्याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्रमांक 3881 / 2023 दाखल असून नामांतराबाबत प्राप्त झालेल्या आक्षेपांची सुनावणी चालू असताना महसूल व इतर विभागाशी संबंधित कार्यालये जिल्हयाचे नाव बदलत असल्याची बाब याचिकाकर्ते यांचे विधिज्ञांनी मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
त्यावर मा. उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयांनी उस्मानाबाद नावात बदल न करणे बाबत निर्देश दिले आहेत. मा. उच्च न्यायालयाच्या दि. 20 एप्रिल 2023 व दि. 14 जून 2023 रोजीच्या आदेशाची प्रत संलग्न करून जिल्हयातील सर्व विभागप्रमुख व सर्व कार्यालय प्रमुख यांना याव्दारे आदेशीत करण्यात येते की, मा. उच्च न्यायालयाच्या दि. 20 एप्रिल 2023  व दि. 14 जून 2023 चे आदेशातील सुचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे. मा. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत धाराशिव नावाचा वापर करण्यात येवू नये, उस्मानाबाद नावाचाच वापर करण्यात यावा. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी जारी केले आहे.
****

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement