भूम येथील फयाज पठाण आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून एम.पी.डब्लू. व मोका अंतर्गत कारवाई करावी
उस्मानाबाद (शेख जफर रब्बानी)- भूम येथील पठाण फय्याज या युवकाने सुरेश कांबळे व डॉ. स्वामी दामपत्य व कुटुंबातील व्यक्ती यांच्या शाररीक व माणसिक जाचाला कंटाळून आपल्या स्वतःची सदर बाबतीत व्हिडीओ क्लीप तयार करुन यामध्ये सर्वांच्या नावाचा उल्लेख करुन कोणता जाच होता हे स्पष्ट करुन सुरेश कांवळे व डॉ. स्वामी दामपत्य व कुटुंबातील व्यक्ती यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे असा उल्लेख करुन पहाटे 04:00 वाजेच्या सुमारास आत्महत्या केली आहे.
उस्मानाबाद जिल्हातील सदरची घटना ही अत्यंत धकादायक व गांर्भीयाची आहे. उस्मानाबाद जिल्हायात सदरील घटना ही पहिलीच घटना असावी सदर प्रकरणात भूम पोलीस स्टेशन येथे संबंधीत सर्व आरोपींवर गुन्हा दाखल झाला असुन सद्या भूम शहरात परिस्थती अत्यंत गंभीर आहे असे असतानाही आद्याप अश्या गंभीर गुन्हात एकाही गुन्हेगारास अटक झाली नाही ही खेदाची बाब आहे. उस्मानाबाद पोलीस अधीक्षक यांनी याची गांर्भीयाने दखल घेऊन आरोपीस ताबडतोब अटक करावी यातील सर्व आरोपीवर यापुर्वी विविध पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून मोठ्या प्रमाणावर गुन्हागारीची पार्श्वभूमी आहे. अश्या लोकांना ताबडतोब अटक होऊन याप्रवृत्तीचे लोक भविष्यात समाजामध्ये दहशत व गंभीर गुन्हे करणार नाहीत. यासाठी पोलीस खात्याकडुन अतिश्य कठोर व कायदेशीर कार्यवाही होणे आवश्यक आहे, एम.पी.डब्लू. व मोका अंतर्गत कार्यवाही बाबतअसा निवेदन उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक यांना समस्त समाज बांधव यांच्या वतीने देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर मसुद शेख, बाबा मुजावर, वाजिद पठाण,खादर खान, अन्वर शेख,गयाज मुल्ला, खलिफा कुरेशी,आयाज शेख, सय्यद खलील सर, इस्माईल शेख अतिक शेख, काजी एजाज, शेखर घोडके,धीरज मोटे, रणवीर इंगळे, रोहित बागल यांच्या स्वाक्षरी आहेत
0 Comments